Petrol Rate: पेट्रोल दोनशे रुपयांवर गेल्यास फायदाच फायदा; दुचाकीवर फिरता येणार ट्रिप्सी,प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा

0

देशात महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खासकरून इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या इंधन दरवाढ पासून सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी पेट्रोल मंत्र्यांच्या तोंडून काही दिवसापूर्वी कोरोनाच्या लसीमुळेच पेट्रोलचे दर वाढले असल्याचं अजब वक्तव्य निघालं होतं. आता पुन्हा एकदा भाजपचा प्रदेशाध्यक्षांनी एक अजब वक्तव्य करत, आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. (Petrol Rate: If petrol goes to two hundred rupees, the only benefit is; Tripsi will be able to ride a bike, the big announcement of the state president)

गेल्या वर्षभरापासून होत असणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. जानेवारीत ८३ रुपये लिटरने मिळणाऱ्या पेट्रोलचे दर वाढत आज ऑक्टोंबर पर्यंत हे दर 110 रुपयांवर पोहोचल्याने सामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाला आहे. त्यातच आता जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

याचाच हवाला देत भाजप आसामचे प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनी पेट्रोल 200 रुपयांवर गेल्यावर टू व्हीलरवर तिघा जणांना फिरण्याची परवानगी देण्यात येईल, असं अजब वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. त्याच बरोबर आम्ही बाजारात तिघांना बसता येईल, अशा गाड्याही निर्माण करू. असंही या महाशयांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

यापूर्वी पेट्रोल मंत्र्यांनीही इंधनाचे दर हे कोरोणाच्या लसीकरणामुळे वाढलेले आहेत. असं अजब वक्तव्य करत आपल्या अकलेचे तारे तोडले होते. त्यांनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं होतं. “कोरोनाची लस मी माझ्या पैशाने घेतली आहे, त्यामुळे मला पेट्रोलमध्ये डिस्काउंट देण्यात यावं” असं म्हणत,नेटकऱ्यांनी या मंत्र्याला ट्रोल केलं होतं.

देशात काँग्रेस सरकार होतं त्यावेळी पेट्रोल ६०,६५ रुपये लिटर असताना भारतीय जनता पार्टीकडून देशभरात इंधन दरवाढ विरोधात आंदोलने करण्यात आली होती. आता मात्र इंधनाचे दर 100 हून अधिक आहेत, तरीदेखील भारतीय जनता पार्टी कडून सामान्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या नेत्यांकडून अशी गजब वक्तव्य केली जातात.

भारतीय जनता पार्टीने काँग्रेसचे सरकार असताना इंधन दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनाचे,आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसने केलेली इंधन दरवाढ आम्ही पन्नास टक्‍क्‍यांनी कमी करू. असं देखील बोललेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.