महीला हूं,लड़ सकतीं हूं; प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथ यांना आव्हान

0

२०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. खासकरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आपापल्या पक्षाने सुरू केल्याचे दिसत आहे. लखीमपूर खेरीमध्ये नुकत्याच घडलेला हिंसाचारामुळे भाजपला ही निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच आज प्रियंका गांधीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिला उमेदवार असतील, असं जाहीर केल्यामुळे प्रियंका गांधीचा हा निर्णय एकप्रकारे ‘ट्रम्प कार्ड’ असल्याचं बोललं जातंय.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने चिरडल्याने, संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी गेल्या. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे कारण देत, प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलीसांकडून अटक करण्यात आली.

पुढे प्रियांका गांधींनी नरेंद्र मोदींच्या वाराणसी या मतदार संघात सभा घेतली. या सभेला लाखो लोकांचा जनसमुदाय लोटला होता. नरेंद्र मोदी यांच्याच मतदार संघात प्रियंका गांधी यांनी या सभेचे आयोजन केल्याने त्यांचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात देशातला शेतकरी गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करत आहे. या सभेलाही शेतकऱ्यांची खूप मोठी उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.  आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांचे अडचणी प्रश्न जाणून त्यावर तोडगा काढणं तर लांबची गोष्ट आहे,याउलट हे शेतकरी नसून आंदोलकजिवी असल्याचे अजब वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

आता त्याच शेतकऱ्यांचा प्रियांका गांधींना मिळणारा प्रतिसाद पाहून आगामी विधानसभा निवडणुका भाजपसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. त्यातच आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवार महिला असतील. ही तिकिटे जातीच्या आधारावर नाही तर गुणवत्ता पाहून दिली जातील, असं त्यांनी पत्रकार परषदेत बोलताना स्पष्ट केले.

 

प्रियांका गांधी यांनी या पत्रकार परिषदेत अनेक विषयावर भाष्य केले. माझा हा निर्णय उत्तर प्रदेश मधील प्रत्येक महिलांसाठी आहे,हे सांगत असताना प्रियांका गांधी यांनी महिलांना राजकारणात येण्याचा सल्लाही दिला. महिलांना आता बदल हवा आहे. विकास हवा आहे. “महीला हूं लड़ सकती हूं” हा नवा नारा देत ही त्यांनी ही पत्रकार परिषद महिलांना समर्पित करत असल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवामध्ये आगामी काळात(२०२२) विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपसाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं खूप मोठं आव्हान आहे. त्यातच आता प्रियांका गांधींनी ४० टक्के महिला उमेदवार असतील, हे जाहीर केल्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मनाला जात आहे. आगामी काळात पाचही राज्यांच्या निवडणुका असल्या तरी, संपूर्ण देशाचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकांकडे लागले आहे. त्यामुळे आता या निवडणुकात कोण बाजी मारेल? हे येणाऱ्या काळात पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.