धक्कादायक: बायकोशी भांडण झालं म्हणून,पट्ट्याने आपल्याच भावकीतल्या ‘दहा’ जणांची घरे टाकली ‘जा’ळून..

0

पती पत्नीच्या भांडणाला काही कारण लागतेच असं नाही. अनेकदा आपण पाहतो पती-पत्नीच्या भांडणांमध्ये किरकोळ वाद होऊन या वादाचे युद्धात रुपांतर होते. आणि हा वाद एवढा विकोपाला जातो की या वादातून दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशा अनेक घटना आपण आपल्या आसपास, सोशल मीडियावर ऐकल्या,वाचल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला पती पत्नीच्या भांडणाची अशी एक घटना सांगणार आहोत जी घटना ऐकून तुम्ही हादरून जाल.

साताऱ्यामधील पाटण तालुक्यातील माजगावमध्ये पती पत्नीच्या भांडणातून जी घटना घडली, त्या घटनेमुळे शेजारच्या नऊ घरांची राख रांगोळी झाली आहे. वाचून आश्चर्य वाटेल,मात्र ही घटना खरी आहे. संजय रामचंद्र पाटील आणि त्याची पत्नी पालवी या दोघां पती-पत्नीचे कडाक्याचं भांडण झालं. आणि संतापाने रामचंद्र पाटील याने आपलं स्वतःचेच घर आग लाऊन ‘जा’ळून टाकल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

पती रामचंद्र पाटील याने आग लावल्यामुळे घरातील दोन सिलेंडरने पेट घेतला. आणि पाहता पाहता आगीचा मोठा भडका उडाला. आगीने ‘रौद्ररूप’ धारण केल्यामुळे ही आग शेजारच्या ‘दहा’ घरांमध्ये घुसली. आणि होत्याचं नव्हतं होवून बसलं. पती-पत्नीच्या भांडणाची शिक्षा शेजारच्या नऊ घरांना सोसावी लागली, असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे ही आग ज्या ‘दहा’ घरांना लागली. ती ‘दहा’ही कुंटुंबे एकमेकांची ‘भावकी’ असल्याचं सांगण्यात येतंय.

कृष्णात मारुती पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील,संभाजी गणपत पाटील,भीमराव गणपती पाटील,,पांडुरंग महादेव पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, आनंदराव तुकाराम पाटील आणि ज्ञानदेव महादेव पाटील,अशी एकूण दहा जणांची घरे जळून नष्ट झाली आहेत. वरील सर्व पीडित मंडळी एकमेकांची भावकी असल्याचं आडनावावरून दिसून येत आहे.

पती ‘रामचंद्र पाटील’ याने पत्नी सोबत झालेल्या भांडणातून लावलेल्या आगीमध्ये या दहा कुटुंबाची घरे जळली आहेत. मात्र या आगीत कसल्याही प्रकारची जिवीतहानी झालेले नाही. मात्र या आगीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांचे शेती उपयोगी साहित्य, दैनंदिन संसारासाठी लागणारे साहित्य, सोने दागिने,रोख रक्कम,असे अनेक उपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर आसपासच्या लोकांनी अग्निशामक दलाची गाडी बोलवली. आणि दोन-अडीच तासानंतर ही आग विझवण्यात स्थानिक आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याना यश आलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.