धक्कादायक! हिंदूंवर मोठा हल्ला, मंदिरांवर हल्ला करून २९ घरे पेटवली

0

बांगलादेशमध्ये कट्टरवादी चांगलेच फोफावले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बांगलादेशमध्ये जातीय हिंसाचार चालू आहे. जातीय हिंसाचारादरम्यान, कट्टरवाद्यांकडून पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये दुर्गा पूजेचा उत्सव चालू असातना हिंदू देवस्थानांची कट्टरवाद्यांनी तोडफोड केली होती.

त्यानंतर आता कट्टरवाद्यांनी कहरच केला आहे. हल्लेखोरांनी 2 हिंदू तरुणांची हत्या केली आहे. आता हल्लेखोरांच्या एका गटाकडून हिंदू धर्मियांची 29 घरं पेटवली आहेत. बांगलादेशमधील काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशीरा रंगपूर जिल्ह्यातील पीरगंज गावामध्ये हिंदूची घरे पेटवली आहेत. कट्टरवाद्यांकडून हिंदूना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंनवर होणाऱ्या हल्यांमध्ये वाढ झाली आहे.

सोशल मीडियावरुन वायरल झालेल्या ईशनिंदेची चुकीची अफवा पसरवण्यात आली होती. या अफवेमुळे बांगलादेशमध्ये हिंदूविरोधात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळत आहे. बांगलादेशातील पीरोगंज माझीपारा भागात राहणाऱ्या हिंदू युवकाने मुस्लिम धर्माचा कथित अपमान केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर कट्टरवादी हल्लेखोरांकडून या गावातील 29 घरांना आग लावली. या आगीत जिवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही

सोशल मीडियावरुन पसरलेल्या ईशनिंदेच्या अफवेनंतर बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार उसळला. पीरोगंज माझीपारा भागात राहणाऱ्या एका हिंदू तरुणाने धर्माचा कथित अपमान केल्याची अफवा पसरली. ही अफवा मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी या गावातील 29 घरे पेटवली. या आगीमध्ये जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी नाही.

बांगलादेशच्या कोमिला, चांदपुर, चटग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, मौलवीबाजार, गाजीपूर, फेनी यासह अनेक जिल्ह्यांमध्ये कट्टरवादी हल्लेखोरांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांची दुकानं आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केल्याच्या गुन्ह्यांत काही हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बेगमगंज शहरामध्ये दुर्गा पुजेच्या शेवटच्या दिवशी मोठ्या जमावाकडून इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आला. कट्टरवाद्यांकडूनह मंदिर समितीच्या सदस्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांनी इस्कॉन मंदिराची सुध्दा तोडफोड केली. या हल्ल्यामध्ये चार जणांचा मृत्यू Lझाला होता. यानंतर बांगलादेशमधील हिंदू खरंच सुरक्षित नाही असा म्हणायला हरकत नाही. हिंदूंवर आणि हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.