धोनी येताच टीम इंडियाच्या अप्रोचमध्ये बदल; धोनीकडून धडे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल

0

टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीसाठी काल इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये सराव सामना खेळविण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 189 धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतीय फलंदाजांनी तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. आणि या स्पर्धेतला आपण बलाढ्य संघ असल्याचं दाखवून दिले.

महेंद्रसिग धोनीची मेंटॉर म्हणून निवड झाल्यामुळे भारतीय संघाची ताकद आता द्विगुणीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू मैदानावर आता धोनीकडून क्रिकेटचे धडे घेताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेला आयपीएल सिझन१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत विजेतेपद पटकावले आहे.

महेंद्रसिंग धोनीचा तगडा अनुभव आणि क्रिकेट विषयी असणारी जाण, त्याचबरोबर डावपेचात मातब्बर असणारा, धोनी भारतीय क्रिकेट संघासोबत एज ‘मेंटॉर’ म्हणून काम करत आहे. आणि याचा परिणाम क्रिकेट चाहत्यांना पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाला. पहिला सराव सामन्यात भारतीय संघ कुठेही डगमगला नसल्याचे पाहिला मिळाले. प्रत्येकजण फेअर लेस क्रिकेट खेळताना, पाहायला मिळाला. आणि ही सगळी कमाल धोनीचीच असल्याचं क्रिकेट वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली देखील, ड्रेसिंगरूममध्ये महेंद्रसिंग धोनीसोबत बसून चर्चा करत असल्याचे,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. संघ निवड,खेळपट्टीची ओळख, खेळाडूंना क्रिकेटचे धडे, प्रोत्साहन अशा अनेक गोष्टींचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला महेंद्रसिंग धोनीच्या ‘मेंटॉर’शिप मुळे मिळणार असल्याचं बोललं जातंय. याची झलक आपल्याला इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात देखील पाहिला मिळाली आहे.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत १८९ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली असं वाटत असलं तरी, ही खेळपट्टी निव्वळ सपाट होती. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर १८८ धावा ही फार मोठी धावसंख्या म्हणता येत नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजी ठिकठाक होती,असच म्हणाव लागेल. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले.

प्रतिउत्तरात भारतीय संघाने जबरदस्त सलामी दिली. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या के एल राहुलच्या बॅटमधून अप्रतिम फटके पाहायला मिळाले. त्याने अवघ्या २४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. तर दुसरा सलामीवीर ईशान किशनने सगळी सूत्रे आपल्या हातात घेत, 40 चेंडूत 70 धावांची तडाकेबाज खेळी केली. कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला. मात्र विकेट कीपर ऋषभ पंतने मैदानावर येताच,तीन गगनचुंबी षटकार लगावले,आणि हा सामना एकतर्फी करून टाकला.

इंग्लंडने दिलेले 189 धावांचे आव्हान भारताने एक षटक राखून तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. भारताचा दुसरा सराव सामना उद्या दुपारी तीन वाजता ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.