पवारांमुळे मुख्यमंत्रिपदावर बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एकेकाळी शरद पवारांची काढली होती ‘लाज’…

0

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. प्रत्येक जण मान्य करेल. निवडणुकीत एकमेकांवर गरळ ओकणारे मंडळी, निकालानंतर कशी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात हे आपण विविध राज्यांत अनेकवेळा पाहीलं असेल. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. हे महाराष्ट्राने देखील 2019 च्या विधानसभा निकालानंतर अनुभवल्याचे आपण पाहिले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले. युती आणि आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना अनेकांनी आपली पातळी सोडल्याचेही पाहायला मिळाले. या निवडणुकीत खास करून भाजप आणि शिवसेनेचाही शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिक जोर असल्याचे दिसून आले.

2019 विधानसभेचे निकाल हाती आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होईल हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकल्या. तर ५६ जागा जिंकत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहीली. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे सरकार येईल असं वाटत होतं, मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री आपलाच होणार,असं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. आणि अनेक राजकीय घडामोडी नंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं.

महाविकास आघाडी असं या सरकारचं नावठेवण्यात आलं. पवार आणि संजय राऊत यांच्या पुढाकाराने साकार झालेल्या या सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना करण्यात आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते मात्र शरद पवार आग्रहामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. प्रत्यक्ष राजकारणाचा कसलाही अनुभव नसणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राची धुरा सांभाळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आतापर्यंत ठाकरे यांच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकार चांगलं काम करत असल्याचं बोललं जातं.

शरद पवार यांच्या पुढाकाराने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदासाठी अनुकूल नव्हते, मात्र शरद पवार यांच्या आग्रहामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. परंतु परंतु निवडणुकीच्या काळात याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला होता. एका प्रचार सभेत शरद पवार यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका केली होती.

 

प्रचारसभे दरम्यान उपस्थितांशी बोलताना साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, “पवार साहेबांचा सोडा, मोदीजींनी विचारलं पवारसाहेब आपको पसंद हैं क्या? मैंने कहा, पवार साहब को छोड़ो उनको लाज, लज्जा, शर्म है ही नहीं कुछ” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केला होता. मात्र पुढे याच शरद पवार यांच्या वरदहस्तामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे सहसा कोणालाही माहिती नाही. राजकारणात अनेक नेतेमंडळी विरोधकांनी आपल्यावर केलेली वयक्तीक टीका देखील विसरून पुढे जाताना पाहायला मिळतात.

तिन्ही पक्षांचं मिळून तयार झालेलं, हे महाविकास आघाडी सरकार,उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तम काम करत असल्याचं,शरद पवार यांनी अनेक वेळा सांगितल्याचं आपण पाहिलं असेल. विरोधकांकडून हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असा सातत्याने आरोप केला जातो. मात्र या आरोपाला उत्तर देताना शरद पवार स्वतः हे सरकार पाच वर्षे टिकेलच, मात्र पुढची पाच वर्ष देखील हे सरकार महाराष्ट्रात राज्य करणार असल्याचे सांगतात.

हेही वाचा –बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.