Facebook down:फेसबुकने वापरकर्त्यांची माफी मागितली; तांत्रिक अडचणीचे कारण जाणून बसेल धक्का

सोशल मीडिया आपल्या आयुष्याची मूलभूत गरज बनलीय, हे कोणीही नाकारू शकणार नाही. “whatsapp instagram Facebook” वापरताना काही अडचणी आल्या तर, आपल्याला वेड लागल्यासारखं होतं,हे देखील बरीचशी मंडळी मान्य करतील.

काल रात्री-नऊच्या सुमारास फेसबुक, इंस्टाग्राम,व्हाट्सअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतांना वापरकर्त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला.

काही तांत्रिक अडचण आल्यामुळे ही तिन्हीं प्लॅटफॉर्म्स जवळपास बंद पडली होती. या संदर्भात अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला रोष देखील व्यक्त केला.

ही तिन्हीं माध्यमं बंद पडल्यानंतर वापरकर्त्यांनी ‘ट्विटर’वर व्हाट्सअप डाउन, फेसबुक डाउन हा हॅशटॅग ट्रेंड केला.(#whatsapp_down)( #Facebook_down)

हे तिन्हीं माध्यमं चालत नसल्यामुळे,आपण देखील त्रस्त झाला असाल. मात्र ही ‘तांत्रिक अडचण’ कशामुळे आली होती, याची तुम्हाला कल्पना आहे का?

फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वापरताना यूजर्सना काही अडचणी येत असल्याचे आमच्या लक्षात आलं आहे. ही अडचण कशामुळे आली आहे याचा आम्ही शोध घेत असून, लवकरच पूर्वीप्रमाणे तुम्हाला या माध्यमांचा वापर करता येईल. तुम्हाला येत असणार्‍या अडचणींविषयी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. असं फेसबुक आणि व्हाट्सअपने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

रात्री नऊच्या सुमारास आलेली ही अडचण पहाटे 5 वाजता दूर झाली. आणि वापरकर्त्याने एकदाशी सुटकेचा निश्वास सोडल्याचे पाहायला मिळाले.

इंस्टाग्राम आणि फेसबुक पहाटे चारच्या सुमारास सुरू झाले. मात्र व्हाट्सअप वापरणाऱ्यांना ही समस्या कमी जास्त प्रमाणात जाणवत होती. व्हाट्सअपच्या हे लक्षात आल्यानंतर व्हाट्सअप ने पुन्हा यूजर्सची दिलगिरी व्यक्त केली. आणि आता पुन्हा ‘व्हाट्सअप’ पूर्वीप्रमाणे काम करत असल्याचं व्हाट्सअपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनर म्हटलं आहे.

व्हाट्सअप नेमकं काय म्हणालं?

आम्ही आता परत आलो आहोत आणि १००%धावतही आहोत. आमच्या टीमने व्हॉट्सअॅप पुनर्संचयित करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. आपल्या संयमाबद्दल आज आम्ही जगभरातील प्रत्येकाचे आभार मानतो. आम्ही खरोखरच तुमचे कौतुक करतो, आणि लोक आणि संस्था दररोज आमच्या अॅपवर किती अवलंबून असतात यावरून नम्र होत राहतो. असं व्हाट्सअप आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हणालं आहे.

अनेकांनी ही अडचण कशामुळे आली होती? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तांत्रिक अडचण कशामुळे आली होती? हे कोणालाही समजू शकलेलं नाही. या अडचणीची ठोस अशी कोणतीही कारणे समोर आलेली नसल्याचे स्वतः फेसबुक आणि व्हाट्सअपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन युजर्सना सांगितले आहे.

ही अडचण कशामुळे आली होती? याची ठोस कारणे समोर आल्यानंतर आम्ही तुम्हाला निश्चित सांगू,असं देखील फेसबुक आणि व्हाट्सअप आपल्या यूजर्सना म्हणालं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.