धोनी ˈमेन्टॉर म्हणून आल्याने भारतीय संघावर वाईट परिणाम होणार;सुनिल गावस्कर

ओमान आणि यूएईमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची काल रात्री ९ वाजता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीकडे तमान क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. काही प्रमुख खेळाडूंना निवड समितीने डच्चू दिला. तर काही अनुभवी खेळाडूंना संधी देखील देण्यात आली. मात्र या सगळ्यात सर्वात चर्चेचा विषय राहिला तो ‘महेंद्रसिंग धोनी’च्या कमबॅकचा!

टी-ट्वेण्टी वर्ल्ड कपसाठी भारताचा माजी कर्णधार आणि ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीची भारतीय संघात ˈमेन्टॉर’ म्हणून निवड करण्यात आली. भारतीय संघ निवडीपेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती धोनीच्या ˈ’मेन्टॉर’ निवडीची. जरी धोनीची सल्लागार म्हणून निवड झाली असली तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा संघाला होणार? की टीम मॅनेजमेंट,कॅप्टन आणि धोनी या तिघांचे वेगवेगळे विचार संघासाठी नुकसानदायी ठरणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लिटल-मास्टर सुनील गावस्कर यांनी ‘धोनी’ची सल्लागार म्हणून निवड झाली,त्यावर एक भाष्य केले आहे. सुनील गावस्कर म्हणाले, जर रवी शास्त्री आणि धोनी या दोघांमध्ये अनेक विषयांवर एकमत झालं, मतभेद झाले नाहीत तर,याचा खूप मोठा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. मात्र या दोघांमध्ये मतभेद झाले तर,त्याचा वाईट परिणाम देखील टीमवर पडू शकतो.

एका टीव्ही चॅेनलच्या कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्करांनी २००४मध्ये घडलेला एका घटनेची आठवण करून दिली. २००४ मध्ये जॉन राईट कोच असताना मला देखील ˈमेन्टॉर म्हणून निवडले होते. मात्र जॉन राईट यांना मी त्यांची जागा घेतोय असं वाटत होतं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.