Politics :राष्ट्रीय समाज पक्ष नातेपुते नगरपंचायत आगामी निवडणूक स्वबळावर लढणार : अमरजीत जानकर

Politics: नुकतीच नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपरिषेमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. तसे आदेश समंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नातेपुते येथे लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध पक्षांनी व राजकीय गटांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. (Politics: A meeting of Rashtriya Samaj Party office bearers was held at Natepute.)

9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या नातेपुते येथील संपर्क कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. येणाऱ्या नातेपुते नगरपंचायत मध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी सुशिक्षित व अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी नातेपुते मधील जाती-धर्म पक्षपात बाजूला ठेवून रासप मोहिमेत सहभागी व्हावे,आता शहरातील प्रत्येक घर वाडी वस्तीवर आमच्या पक्षाचा कार्यकर्ता तयारीत आसुन आम्ही आगामी नातेपुते नगर पंचायत निवडणुकीला सामोरे जावु असा ठाम विश्वास असल्याचे रासप  नातेपुते शहराध्यक्ष अमरजीत जानकर यांनी सांगितले.  येणाऱ्या काळात अनेक समूह व दिग्ग्ज पक्ष प्रवेश करणार आहेत असे देखील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवर रासप मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे अल्पसंख्याक आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष बशीर काझी,अल्पसंख्याक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शहीद मुलाणी, सोलापूर जिल्हा प्रभारी रासप रणजीत सुळ, सोलापूर जिल्हा युवक प्रभारी माऊली सरक,महिला आघाडी च्या कविता माने,माळशिरस तालुका प्रभारी रासप शंकर शेंडगे माळशिरस तालुका विधानसभा अध्यक्ष संजय वलेकर युवा उद्योजक बाबा बोडरे,माळशिरस तालुका नेते अण्णासाहेब पांढरे,तालुका संपर्क प्रमुख सहदेव गोफणे,विद्यार्थी अध्यक्ष सागर राऊत,जेष्ठ नेते बापू जानकर उपस्थित होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.