corona vaccine : देशात ५ व्या लशीला परवानगी; जॉन्सन अँड जॉन्सनच्या ( Johnson and Johnson) सिंगल डोस लस भारतात.

0

 Corona Vaccine: नुकतीच जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या लशीला भारतात परवानगी देण्यात आली आहे. या लशीचा एकच  डोस देण्यात येतो. या लसीला  देशात इमेर्जनसी  वापर करण्यास  परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय  यांनी याबाबत अधिकृत ट्विट करत ही माहिती दिली.  भारतात याअगोदर कोविशिल्ड, Co- Vaccine, फायझर,स्पुतनिक व्ही या लशींना परवानगी देण्यात आली आहे. त्यात आता जॉन्सन आणि जॉन्सनची या लसीचा देखील आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्लोबल हेल्थ केयर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने या अगोदर देशात इमेर्जन्सी  वापरासाठी लसीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील केली होती. त्यानुसार आता ही परवागनी देण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने या लसीचा एकच डोस घेतल्याने कोरोना विषाणू सोबत लढण्यास ८६ टक्के प्रभावी आहे असा दावा जॉन्सन अँड जॉन्सनने केला आहे. सोबतच कंपनी ही लस खूप फायदेशीर ठरेल सोबत आमच्या लसीमुळे मृत्युदर देखील कमी होईल असा देखील दावा कंपनीने केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.