Politics: पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाला काळी बाहुली

पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  अंधश्रद्धेची बाधा झाली की असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे कारण देखील असेच आहे. पाठीमागील महिन्यामध्ये  महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवारांच्या हस्ते पुणे शहर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य दरवाजाजवळ  काळी बाहुली कोहळ लावण्यात आली आहे. (Politics: Black dolls at NCP office in Pune)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा   पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला पक्ष  मनाला जातो. पक्षाची ध्येयधोरणे देखील पुरोगामी विचारांची आहेत. अशा पद्धतीने काळी बाहुली आणि कोहळ मुख्य दरवाजाजवळ लावण्याचा उद्देश  काय आहे हे  शकलं नसले तरी , या घटनेची  मात्र सर्वत्र चर्चा आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. पुण्याला   सांस्कृतिक वारसा देखील आहे. विरोधकांकडून देखील याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.