मोबाईल नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर मेसेज कसा करायचा?

0

आजकाल व्हाटसॲपचा वापर करत  नाही किंवा माहित नाही असा या जगात शोधून सापडणार नाही. व्हाटसॲपचा वापर एवढा प्रचंड वाढला आहे की  एसएमएसची आठवण देखील  येत नाही. व्हॉट्सअँप बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. आजकाल व्हाटसॲपवर काय होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण व्हॉट्सअँप वरती सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळत आहेत. चॅटिंग, ऑडिओ/व्हिडीओ कॉल, पेमेंट पाठवणे त्याचसोबत बऱ्याच चांगल्या गोष्टींमध्ये व्हाटसॲपने आपली  मजल मारली आहे.

रोजच्या व्यावसायिक कामांमध्ये अनेकदा एखाद्या नवीन व्यक्तीला आपल्याला एकदाच मेसेज करायचा असतो मग  त्यासाठी आधी त्या व्यक्तीचा मोबाईल  नंबर तुम्हाला फोनबुकमध्ये सेव्ह करावा लागतो. यानंतर त्या व्यक्तीचा नंबर व्हाटसॲपवर आल्यावर आपण त्या व्यक्तीला मेसेज करू शकत होतो. परंतु एखाद्याला जर त्या व्यक्तीला  केवळ एकदाच मेसेज करायचा असल्यास हि पद्धत त्रासदायक ठरत होती.  कारण यामुळे खूपदा अनावश्यक कॉन्टॅक्टस फोनबुकमध्ये सेव्ह करावे लागत होते. आज आपण   नंबर सेव्ह न करता देखील समोरच्या व्यक्तीला व्हाटसॲपवरून कसा मेसेज करायचा हे जाणून घेणार आहोत.

१. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट ब्राउझर उघडा. जसे की गुगल क्रोम, याहू

२. यामध्ये https://wa.me/<number> अशी लिंक तयार करा. <number> या ठिकाणी  तुम्हाला ज्या व्यक्तीला  मेसेज करायचा आहे त्या व्यक्तीचा नंबर टाकावा लागेल.  नंबर इंटरनॅशल फॉरमॅटमध्ये असणे गरजेचे आहे. खालील प्रमाणे नंबर टाकावा.

योग्य : https://wa.me/91987654321 असा नसावा.

अयोग्य : https://wa.me/987654321 किंवा https://wa.me/+91-987654321 असा असावा.

3. हि लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये  उघडल्यानंतर तुमच्यासमोर खालील प्रमाणे स्क्रिन ओपन होईल. यामध्ये  Open this page in WhatsApp? असा मेसेज तुमच्या समोर  असेल .

यानंतर Open वर क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हाटसॲपमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत चॅट करायचे आहे त्या नंबरची चॅट उघडेल. यानंतर तुम्हाला हवा तो मेसेज पाठवू शकता   व  चॅट सुरु करू शकता.

ही माहिती आवडल्यास नक्की शेयर करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.