पंतप्रधान मोदींकडून खासदार रणजितसिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सोबत शुभेच्छापत्र.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. १९ फेब्रुवारी २०२० रोजी पक्षाची महत्वाची बैठक दिल्ली येथे असल्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदारसंघात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गृह मंत्री ना. अमित शाह, संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंह, रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.