…याचं सगळ्यांनाच पडलंय कोडं,भाजप बोलेल का यावर थोडं?

इंधन दरवाढीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीन्स व्यंगचित्रे, बनताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फक्त त्याचा संताप सोशल मीडियावरच होतोय असं नाही तर, विरोधकांकडूनही या इंधनदरवाढवर केंद्र सरकारला सातत्याने धारेवर धरल्याचे पाहिला मिळत आहे.

देशात काँग्रेस सरकार होतं तेव्हा, पेट्रोल सत्तरीच्यावर गेल्यावर भाजपकडून मोठमोठी आंदोलने केली गेली. आता मात्र पेट्रोल शंभर रुपये झाले तरी भाजप मूग गिळून गप्प आहे,असं विरोधकांकडून सातत्याने बोलण्याचं दिसून येतंय. काँग्रेस काळात मोदींनी इंधन दरवाढी विषयी केलेले भाष्य सोशल मीडियावर अनेकांनी वायरल करून त्यावर अनेक मिम्स देखील बनवल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर नेहमी ॲक्टीव्ह असणारे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार, ‘रोहित पवार’ यांनी देखील इंधन दरवाढीविरोधात एक छोटीशी कविता करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक छोटीशी कविता पोस्ट करत केंद्र सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल 100 रुपये लिटर झालंय, घरगुती गॅसचा देखील भडका उडालाय. सर्वसामान्यांना या गोष्टीचा अजिबात फायदा होताना दिसत नाही. मग या गोष्टींचा फायदा नक्की उठवतंय कोण? सत्तेत येण्यापूर्वी इंधनाचे दर आम्ही कमी करू,असा वायदा कोणी केला होता? तो वायदा आता कोण मोडतंय? याचं सगळ्यांनाच कोड पडलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर भाजप काही बोलणार आहे का नाही? असा खडा सवाल या कवितेमधून रोहित पवार यांनी भाजपला विचारल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर रोहित पवारांची ‘ही’ कविता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.