एकनाथ खडसेंचा भाजपाला दे धक्का;18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

फडणवीसांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे वारंवार सांगत,भारतीय जनता पार्टी पक्षामधून बाहेर पडणारे एकनाथ खडसे यांनी भाजपला भुसावळमध्ये मोठा दे धक्का दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर अनेक वेळा आपली खंत व्यक्त करत खासकरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोश असल्याचं देखील निदर्शनास आणून देताना कोणतीही कसर ठेवली नाही. एकदिवस या गोष्टींना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जळगावमध्ये भाजपाला मोठे नुकसान होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आत्तापर्यंत ते दिसून आलं नव्हतं. मात्र काल भाजपच्या भुसावळच्या तब्बल 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने, भुसावळमध्ये भाजपाला मोठे खिंडार पडल्याचं दिसून येत आहे

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये भाजपाला मोठं खिंडार पाडण्यात यश आलं आहे. भाजपचे तब्बल 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांनी एकनाथ खडसेंच्या मार्गदर्शनाखाली, आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांनी केलेले या करिष्म्यावर भाजप नेते खास करून देवेंद्र फडणवीस, काय बोलतात? हे पाहणं खूप उत्सुकतेचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.