काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवू,असं कोण म्हणालं? वाचा सविस्तर!

गेल्या काही वर्षापासून काँग्रेसला देशभरात सातत्याने अपयश येताना दिसून येत आहे. विपक्ष खूपच कमजोर असल्याचा आरोपही काँग्रेसला सातत्याने सहन करावा लागत आहे. राज्यासह देशभरात काँग्रेस कशा प्रकारे कामगिरी करतो याला खूप महत्त्व आहे.

‘नाना पटोले’ यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, लगेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. नाना पटोले यांची महाराष्ट्राचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा करत कार्यकर्त्यांचा जोश उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

2014 ची लोकसभा नाना पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली. मात्र त्यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांविषयी अनुकूल नसल्याचे कारण देत, संसदेतच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत संगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2019 ची लोकसभा भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2019 ची विधानसभा काँग्रेसकडून जिंकत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच ते या पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी धुरा सांभाळत आहेत.

प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नाना पटोले यांनी देखील कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार करत,आभार मानले. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनवूया असं आश्वासनही देऊन टाकलं. या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचा जोश आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशाप्रकारे कामगिरी करतो,हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.