वाडा येथील विज वितरण कार्यालयाला टाळे ठाेकण्यासाठी हल्ला बाेल करत भाजपाचे आंदोलन

वाडा प्रतिनिधी

वाडा- महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४५ लाख विज ग्राहकांना विजचे कनेक्शन ताेडण्यासाठी नाेटीस पाठविली आहे त्या विरोधात भारतीय जनता पार्टीने राज्यातील विज वितरण कार्यालयांना टाळे ठाेकण्यासाठी हल्ला बाेल करत आंदोलन करण्याचे ठरविले असल्याने वाडा येथील विज वितरण कार्यालयाला टाळे ठाेकण्यासाठी हल्ला बाेल करत भारतीय पार्टी वाडा तालुक्याच्या वतीने आंदोलन केले.
आंदोलनाच्या वेळी तालुका अध्यक्ष श्री मंगेश पाटील हेमंत सवरा, साै. अंकिता दुबेले यांनी शासनाच्या चुकीच्या विज बील धाेरणांवर कडाडून टीका केली.


यावेळी वाडा तालुका भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.बाबाजी काठाेले, श्री.हेमंत सवरा, श्री.सुरेश पाटील, वाडा तालुका अध्यक्ष श्री. मंगेश पाटील, तालुका महिला आघाडी प्रमुख साै. अंकिता दुबेले, जेष्ठ महिला कार्यकर्त्या साै शुभांगी उतेकर,जि.प, पं.स सदस्य,नगरसेवक इत्यादी कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.