१५ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होणार – उदय सामंत

महाराष्ट्रातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारपरिषदेतून दिली. ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कॉलेज सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक असणार आहे. ही कॉलेज सुरू होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देखील काही गाइडलाइन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास करोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.

यावेळी बोलत असताना उदय सामंत म्हणाले, कॉलेज सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची असायला हवी. विद्यापीठ आयोगाने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालयं सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉलेज सुरू होतील.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.