सिद्धटेक सिद्धिविनायकाला भाविकांची तुफान गर्दी

सिद्धटेक,(कर्जत)-संकष्टी चतुर्थी व नवीन वर्षाची सुरुवात या दोन्हीमुळे सिद्धिविनायक मंदिरात कालपासून भाविकांची भरपूर गर्दी होत आहे.

पाठीमागील काही काळापासून लॉकडाऊन मुळे मंदिर बंद होते. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाता येत नव्हते. परंतु दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आणि भाविकांची गर्दी सर्व मंदिरांमध्ये एकाकी निर्माण होऊ लागली. भाविक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी घरातून बाहेर निघू लागले.

काल, एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आणि आज संकष्ट चतुर्थी यामुळे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनाला येत आहेत. सर्व भाविक गणपतीबाप्पांना हेच साकडे घालत आहेत की देशावर आलेलं हे कोरोना महामारीच संकट लवकरात लवकर निघून जावं व पुन्हा एकदा सामान्य जीवन सुरु व्हाव. बाप्पा आमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल अशी भाविकांची आशा आहे.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, त्यामुळे उमेदवारी करणारे उमेदवार श्रींच्या आशीर्वादासाठी मोठ्या प्रमाणे येताना दिसत आहेत. श्रींकडून आशीर्वाद घेऊन आपल्या विजयाची मनोकामना करत आहेत..

भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे मंदिर परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण याच व्यावसायिकांवर पाठी मागील काही काळात भूकमारी ची वेळ आली होती. मंदिर परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला भेटत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे. भाविकांनी मास्क चेहऱ्यावरती बांधला आहे याची खात्री करूनच भाविकांना दर्शनासाठी आत सोडले जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.