मनसेचे ‘मसल मॅन’ कंगना राणावत सोबत सिद्धिविनायक मंदिरात

सध्या आपल्या बेताल वक्तव्य करण्यात पटाईत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हीने काल सिद्धीविनायक मंदिर येथे  जाऊन त्या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतले. त्यावेळी बोलत असताना कंगना म्हणाली मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणालाही  परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगणाने शिवसेनेवर टीका केली होती.

मात्र, आता  शिवसेनेशी व महाविकास आघाडी ला टार्गेट करणाऱ्या कंगनाला मनसेचा पाठिंबा आहे की काय? असा सवाल या  उपस्थित होऊ लागला आहे. कंगना राणावत सोबत मनसेचे मसल मॅन म्हणून ओळख असलेले मनीष धुरी हे पहायला मिळाले.

मनिष धुरी हे मनसेचे निष्ठावंत  कार्यकर्ते आहेत.  मनसेचे  मसल मॅन मनिष धुरी हे कंगनासोबत पाहायला मिळाल्यानंतर त्यांनी आपले कंगनासोबत  अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेह  असल्याचे सांगितले. त्यांचे बंधू कुशल धुरी देखील कंगना सोबत पहायला मिळाले.

मसल मॅन मनिष धुरी कोण आहेत?

मनिष धुरी हे मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघ विभागाचे अध्यक्ष आहेत. धुरी हे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवटवर्तीय व निष्ठावंत  मानले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही कार्यक्रम व आंदोलनमध्ये  मनिष धुरी हे सक्रिय असतात.

दरम्यान मनसेचे मुख्य पदाधिकारी  कंगनासोबत पाहायला मिळाल्याने आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाला मनसेचा छुपा पाठींबा तर नाही ना? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.