दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर उतरेल- आमदार अंबादास दानवे
कृषी कायद्या विरोधात मागील ३० दिवसापासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शिवसेना संभाजीनगरच्या वतीने शिख बांधवासह शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले, शहरातील गुरुगोविंदसिंह पूरा चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात शीख बांधवासोबतच शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की दिल्लीत पंतप्रधानांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतकरी बांधव आंदोलन करीत आहेत त्यांच्याशी बोलायला त्याना वेळ नाही परंतु ३००० किलोमीटर दूर असणाऱ्या शेतकऱ्यांना ते बोलतात ही एक प्रकारे शेतकरी आंदोलनाची व शेतकऱ्यांची थट्टा आहे.
केंद्रातील भाजपचे मंत्री म्हणतात या आंदोलनात पाकिस्तान व चीन चा हात आहे कोणी म्हणतात या आंदोलनात खलिस्तानी घुसले आहेत न्याय देणे तर दूरच अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून वारंवार शेतकऱ्यांची व या आंदोलनाची थट्टा करण्यात धन्यता मानत आहे ,केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.
आज शिवसेना शेतकरी बांधवां बरोबर धरणे आंदोलन करत आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मांन्य झाल्या नाही तर आजपासून सुरु झालेली ही आंदोलनाची सुरुवात आहे आणि हे आंदोलनाचे लोण गावागावात ,महाराष्ट्रात ,देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही वेळ पडली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
“शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कारअसो ” , “या केंद्र सरकारच करायचं काय खाली मुंडके वर पाय ” , “हल्लाबोल हल्लाबोल मोदी सरकारवर हल्लाबोल ” “जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ” या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आंदोलनात आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडले, राजेंद्रसिंग जबिंदा, अनिल पोलकर बाप्पा दळवी राजू वरकड दिनेश मुथा विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या धरणे आंदोलनाप्रसंगी राजविंदरसिंग ढोडी, राजेंद्रसिंग सोढ़ी ,मंनबीरसिंग दखन, हरमीतसिंग वकील, आदेशपाल सिंग छाबडा, रंणजीत गुलाटी, इंदरजितसिंग छतवाल ,प्रीतीपालसिंग ग्रंथी, सतपालसिंह ग्रंथी, नरेंद्रसिंग जाबींदा जगप्रीतसिंग लांबा, अजितसिंग शिलेदार, गुरुप्रीत सिंग पंदोर ,गुणवंत सिंग जाबिंदा रणवीर सिंग जाबिंदा, प्रितम सिंग काचवाले ,धरमसिंग काचवाले, राजासिंग कौशल ,हरिसिंग काचवाले ,सुरेंद्रसिंग सबरवाल.
त्याचसोबत हरविंदरसिंग सलुजा ,हरदेव सिंग मुंदाल, अमोलसिंग ,दर्शनसिंह, गुरुबचन सिंग, सतबीर सिंग, आकाश सिंग ,मंजीत सिंह जोगिंदर सिंग ,महिंद्र सिंह ,शरण सिंग चंडोक ,सवींदरसिंग सेठी, जीवन सिंग सिद्ध ,अमरदीपसिंग गिल ,गजानन बारवाल ,रमेश बहुले , वसंत शर्मा ,प्रा. संतोष बोर्डे,संजय हरणे, अंबादास म्हस्के,संतोष खेंडके, प्रमोद ठेंगडे,आदी मोठ्या संख्येने उपस्थीती होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.