निलेश राणे तुम्ही बारामतीत याच… असे कोण म्हणाले?

सध्या निलेश राणे हे शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांवर वारंवार टिकास्त्र सोडत आहेत. अजित पवार यांच्या नावावर ग्रामपंचायत सदस्य सुध्दा निवडूण येत नाही अशी घणाघाती टीका माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. अजित पवार यांच्याकडून कुठलीही कामे झाली नाहीत असे देखील निलेश राणे म्हणाले.

त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत आतापर्यंत अजित दादा पवार यांनी काही कामे केलीत ती पाहण्यासाठी बारामतीला या. बारामतीतील ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घ्या. येथील कामे पाहा. निवडूण आलेल्या सदस्यांसोबतच या ठिकाणच्या ग्रामपंचायत इमारती पाहा.

आपण सतत वेगवेगळ्या विषयांना अर्धवट माहितीनुसार बोलत असता, काहीही बरळत असता. खरतर आपले वडील नारायण राणे यांना देखील आपल्या अशा वागण्यामुळे वाईट वाटत असेल. आपण बारामतीला या म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल.

आपण सतत पराभूत होत असल्यामुळे आपल्याला वैफल्य आले असेल. कदाचित यामुळेच आपण अशा प्रकारची वक्तव्ये करत असाल. त्यामुळे आपल्याला समजत नसेल की आपण काय बोलत आहात ते.

आपण आपल्या घरातून कधी बाहेर पडले नसाल. आपल्या डोक्यात असणारी झिंग बाजूला ठेऊन एकदा बारामतीला या म्हणजे आपल्याला आपल्या डोक्यातील झिंग उतरेल. तुम्हाला हेही समजेल की देशाचे पंतप्रधान मोदी यांनी बारामतीचे कौतुक का केले?

असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी निलेश राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.