भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना अटक.
भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव वारंवार प्रकृतीची कारण देत होते. जाधव हे आपल्या छातीत दुखत असल्याचे अटक टाळण्यासाठी पोलिसांना सांगत होते. मात्र पोलिसांनी देखील ससून हॉस्पिटलमध्ये जाधव यांची तपासणी केली व जाधव यांना अटक केली आहे . हर्षवर्धन जाधव यांच्यावर किरकोळ अपघातामधून झालेल्या भांडणामध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याबद्दल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जाधव हे नेहमीच काही ना काही प्रकरणामध्ये चर्चेत येत असतात. भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहे. स्वतःच्या सासऱ्या सोबत देखील जाधव यांचे काडीमात्र पटत नाही. जाधव यांची राजकीय कारकीर्द नेहमी वादग्रस्त राहिली आहे. सुरुवातीला मनसे या पक्षाकडून आमदार झाले. जाधव यांनी नंतरच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी नंतर शिवसेना पक्ष देखील सोडला. जाधव हे नेहमी कौटुंबिक गोष्टींमुळे चर्चेत असतात. २०१९ साली जाधव यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.
हर्षवर्धन जाधव व इशा झा यांच्यावर पुण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील चतुरशृंगी पोलीस ठाण्यामध्ये जाधव व इशा झा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमन चड्डा यांनी तक्रार दिली आहे. किरकोळ अपघातावरून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप जाधव यांच्यावर आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.