साहेब तुम्ही होतात म्हणूनी…; असं संजय राऊत कोणाला आणि का म्हणाले? वाचा सविस्तर!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

गेल्या अनेक दशकांपासून शरद पवारांनी राजकारणात आपल्या नावाचा दबदबा राखत देशाच्या आणि राज्याच्या विकासात खूप मोठे योगदान दिले आहे. पवारांनी अनेक दुष्काळ,भूकंप अशा गंभीर परिस्थितीला खूप खंबीरपणे सामोरे जात लोकांना अशा अनेक संकटातून बाहेर काढल्याचे महाराष्ट्र दाखले देत असतो.

कला,क्रीडा,साहित्य,राजकारण अशा अनेक क्षेत्रात शरद पवार यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, विविध क्षेत्रातील मंडळी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या हटके अंदाजात देताना दिसून येतात. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांची नंतर सोशल मीडियावर चर्चा होते. अशीच एक चर्चा संजय राऊत यांनी पवार यांना दिलेल्या शुभेच्छांची सोशल मीडियावर सुरू आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्विट करत म्हटलं आहे, “साहेब तुम्ही होतात म्हणूनी”…. असे एक वाक्य लिहीत संजय राऊत यांनी, विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांच्या या एका वाक्याचे अनेक राजकीय अर्थ निघत असून त्यामधील एक महत्त्वाचा म्हणजे, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार.

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या एका वाक्याचा अनेक राजकीय अर्थ निघत असले तरी,सध्या पवारांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेले महाविकास आघाडी सरकार हे ताजे उदाहरण असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.