काळोख्या रात्रीत ‘रोहित पवारांनी’ हातात दांडा घेत,गावात फेरफटका का मारला? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत असतात. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातल्या तरुणांनी एखाद्या व्यवसायात नवीन पाऊल टाकले तर,त्या दुकानाचे,व्यवसायाचे उद्घाटन करण्यासाठी रोहित पवार आवर्जून हजेरी लावतात आणि शुभेच्छा देतात.
कर्जत जामखेड हा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदार असून देखील रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांना धूळ चारत महाराष्ट्राला आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली. रोहित पवार यांनी फक्त विजयच मिळवला असं नाही तर, तरुणांमध्ये ते अल्पावधीतच कमालीचे लोकप्रियही झाले.
निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विकासासंदर्भात चर्चा केल्याची माहिती ते आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून वारंवार देत असतात. फक्त विकासा संदर्भात चर्चा नाही तर, या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत देखील करताना पाहायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात वांगी सांगवी गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातल्याने स्थानिक नागरिक भयमय झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. मात्र बिबट्या अजूनही हाती लागला नाही. या अधिकाऱ्यांना मदत म्हणून रोहित पवार यांनी देखील हातामध्ये दांडा घेत काळोख्या रात्रीत बिबट्याचा शोध घेत, सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
रोहित पवार यांनी काळोख्या रात्रीत हातामध्ये दांडा घेत वनविभाग अधिकाऱ्यांना बिबट्या शोधण्यास मदत केल्यामुळे रोहित पवार यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. याविषयीची माहिती रोहित पवार यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केली आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी स्थानिक ग्रामस्थांशी आणि पोलिसांशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून दिली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.