कोयत्याने केक कापला, मित्राला पोलिसांनी केली अटक, बर्थ डे बॉय फरार.

गुन्हेगारी क्षेत्रावर बनवलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये  कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे आपण सर्वांनी पाहिलं आहे, असाच  प्रकार  वारंवार सध्या पिंपरी-चिंचवड शहरात येत मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी या ठिकाणी काही  तरुणांनी कोयत्याने केक कापून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केल्याचं समोर आले आहे. या वाढदिवस  प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी  भोसरी पोलिसांनी उशिरा का होईना पण गुन्हा दाखल करून घेतला आहे.  अद्याप मुख्य आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

समीर सियाज बागसिराज (वय वर्ष २०) आणि सोहेल शेख अशी  गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघे मित्र हे दापोडी या ठिकाणी  वास्तव्यास आहे. त्यातील एक आरोपी समीर सियाज बागसिराज यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आजकाल वाढदिवस साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समोर येत आहेत. ‘भाई का बड्डे’ असे म्हणत सध्याचे तरुण कोयत्याने, तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करताना खूपदा  पाहायला मिळत आहे. असा प्रकार सर्वाधिक पिंपरी-चिंचवड शहरात  पाहायला मिळत आहे. पोलीस देखील याबाबत सतर्क झालेले पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावर कडक पाऊल उचलण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाना दिलेली आहे. मात्र, तरीही दापोडी येथे बिनधास्त होऊन काही जणांच्या टोळक्याने वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे.  वाढिवसानिमित्त घटनेचा व्हिडिओ समोर आला असून भोसरी पोलीस हे बर्थडे बॉयचा शोध घेत आहेत.

आरोपी  सोहेल याचा वाढदिवस असल्याने मित्र समीर यानेच वाढदिवसाच्या सर्व नियोजन केले होते. ठरलेल्या नियोजनप्रमाने  ठीक बाराच्या सुमारास सोहेल याने काही मित्रांना बोलावले.  मित्रांना घेऊन कोयत्याने केक कापला व वाढदिवस साजरा केला. यावेळी सोहेल आणि समीर हे दोघे ही कोयत्याने  केकचे तुकडे करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. केक कापून झाल्यानंतर कोयता हा दापोडी या ठिकाणच्या बस स्थानकात लपवून ठेवण्यात आला. भोसरी पोलिसांनी उशिराने का होईना कारवाईला सुरुवात केली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.