दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका

सध्या देशातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी हे आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर दाखल झाले आहे आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे,अशी घोषणा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज केली. अकाली दलाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अकाली दलाचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये  शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाबद्दल चर्चा झाली. ही चर्चा बराच वेळ चालली होती.  विविध पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळेच शिवसेना देखील या बंदमध्ये सामील असणार आहे. ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे.

‌ गेल्या १२ दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली या ठिकाणी आंदोलन करीत आहे. पंजाब व हरियाणा या राज्यातील शेतकरी केंदाच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. १२ दिवसांमध्ये केंद्र शासनाला यावर तोडगा काढता आला नाही. हे आंदोलन देशव्यापी स्वरूप घेऊ पहात आहे. महाराष्ट्र राज्यामधील काही शेतकरी देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

‌ दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीत सरकारी दडपशाहीची पर्वा न करता शेेेतकरी संघर्ष करीत आहे. पंजाब-हरयाणा या राज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवन मरणाचा लढा म्हणूनच तो केंद्र  सरकारशी दोन हात करीत आहे. केंद्राने १२ दिवसांनंतरही या आंदोलनावर केंद्र सरकारने  तोडगा  काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली. असे शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्ह

हा बंद यशस्वी झाला पाहिजे, शेतकऱयांच्या मागण्यांचा आवाज जगभरात गेला पाहिजे हीच शिवसेनेची ईच्छा आहे. महाराष्ट्र राज्याची परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांवर शिवसेना व महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरयाणा या राज्यांसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे अशी टीकाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

शेतकऱयांनी केंद्राच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या बंदमागची भावना नाकारता येणार नाही. कोरोना संकटामुळे संपूर्ण देशच बंद असल्याची परिस्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळात देखील देशामधील  शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे देखील विसरता येणार नाही. यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.