पत्रकार अर्णव गोस्वामी पुन्हा अडचणीत सापडला; रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र केले दाखल

अन्वय नाईक यांनी अर्णव गोस्वामी याच्या स्टुडिओ चे काम केले होते. त्याचे बिल अर्णव गोस्वामी याने न दिल्यामुळे व मानसिक त्रास दिल्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली होती.
उद्योजक अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. ज्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांने मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे.

उद्योजक  अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती अर्जाद्वारे अर्णब गोस्वामी याने हायकोर्टात केली आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची  चौकशी  सीबीआयमार्फत करण्याची मागणी अर्णव गोस्वामी केली आहे. रिपब्लिक टिव्हीचे  मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासोबत इतर तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीदेखील अर्णवने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. अर्नवणे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या त दुसऱ्याच दिवशी रायगड पोलिसांकडून देखील आरोपपत्र दाखल केले गेले आहे.

मुंबईतील ५२ वर्षीय इंटेरियर डिझायनर  अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर या ठिकाणी आत्महत्या केली होती . या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता. रिपब्लिक भारत चा मुख्य संपादक अर्णव गोस्वामी व त्यांच्या दोन   साथीदारांनी अन्वय नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते व सतत तणावात होती.

दुसरी  धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी अन्वय  नाईक यांनी आत्महत्या केली होती त्याचवेळी नाईक  यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील महिन्यात अटकही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अर्णव गोस्वामिचा जामीन मंजूर करण्यात आला होता. आता मुंबई उच्च न्यायालय काय पाऊल उचलणार हे पाहणे ऑस्तूक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.