सोलापूरच्या गुरुजींना मिळाला ७ कोटी रुपयां सह ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूरसह महाराष्ट्राची व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा अवलिया रणजितसिंह डीसले यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटीं रोख रक्कम असणारा  हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेत शिक्षक म्हणून कामकाज पहात असलेले रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. इंग्लंडमधील लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये या ठिकाणी झालेल्या  कार्यक्रमामध्ये  प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी याबाबत अधिकृतपणे  घोषणा केली आहे. सर्वात महत्वाची बाबा म्हणजे  असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

जगभरातील तब्बल १४० देशामधून १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हेत तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार डीसले यांना जाहीर करण्यात आला आहे.

महत्वाची बाब म्हणजे रणजितसिंह डिसले हे एवढे उदार मनाचे आहेत की त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम म्हणजे ३.५० कोटी एवढी रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या या दातृत्वाच्या भावनेमुळे   ९ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.  आपल्याला मिळालेली रक्कम डिसले   टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असल्याचे रणजितसिंह डीसले यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे विविध नऊ देशांतील कितीतरी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.  रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करीता वापरणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले. महाराष्ट्र लोकशाहीचा रणजितसिंह डीसले यांना व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या डॉ. राजेंद्र भारुड यांना मानाचा मुजरा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.