बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील PSI यांच्यावर गोळीबार.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण तालुक्यातील वढले या गावामध्ये गोळीबार झाला आहे. काल २९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. वढले हे गाव फलटण तालुक्यातील असून फलटण शहरापासून ते ९ किलोमीटर अंतरावर आहे.
सुहास सोनवलकर मुपो. वढले ता. फलटण त्याचा दुसरा साथीदार सुहास सोनवलकर हे दोन आरोपी वधले, या ठिकाणी येणार असल्याचे वृत्त पोलिसांना मिळाले होते. गावच्या आसपास आल्यानंतर पोलीसांनी या दोघांचा पाठलाग केल्यानंतर छऱ्याच्या बंदुकीतून आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक लांडे यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पळशी ते मोरगाव या मार्गावर हा प्रकार घडला होता. दुकानाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. २५ ऑक्टोबर रोजी या दुकानाचे उद्घाटन केले गेले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. सराफ व्यापाऱ्याची गाडी अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चोरी केली गेली होती. ११ लाख ६६ हजाराचे सोने या आरोपींनी चोरले होते. गेल्या महिनाभरापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांना संशयित आरोपी हे फलटण येथील वडले या ठिकाणी असल्याची खबर मिळाली होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.