धक्कादायक! बारामती येथे आईनेच केला चिमुरडीचा खून


आज एकविसावे शतक जरी चालू असले, सर्व प्रकारचे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असले तरीदेखील वंशाचा दिवा ही संकल्पना मात्र बदलली नाही. वंशाचा दिवा मिळवण्याची आत्तापर्यंत अनेक विपरीत घडलेले आपण पहिले आहे. नरबळी दिले गेले. याबाबत अनेक अंधश्रद्धा लोकांच्या मनात मुरल्या आहेत.

पहिल्या दोन मुली असल्यामुळे आरोपी महिला ही फार तणावात होती. यातूनच या महिलेने बारामती येथील माळेगाव या ठिकाणी खून केला. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती. सदर आरोपी महिला ही तिच्या बाळंतपणासाठी माहेरी माळेगाव या ठिकाणी आपल्या वडिलांच्या म्हणजे संदीप जाधव यांच्या घरी आली होती.

आरोपी महिला तिसरी मुलगी जन्मल्यापासून सतत तणावात असायची. यातून तिने तिच्या एका मुलीचा खून करण्याचा निर्णय घेतला. आरोपी महिलेने सव्वा महिन्याच्या पोटच्या गोळ्याला संपवण्याचे ठरवले. या महिलेने राधिकाला पाण्याच्या टाकीत फेकून दिले व चिमुरड्या राधिकाचां त्या ठिकाणी मृत्य झाला.

दिपाली संदीप झगडे असे या आरोपी आईचे नाव आहे. बारामती पोलिसांनी सर्वांची याबाबत कसून चौकशी केली. यामध्ये सर्व संशियतांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना आईवर संशय आला. आरोपी आईने आपणच खून केल्याचे मान्य केले. सदर आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.