विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्याला मारहाण! न्याय मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला मारहाण

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा विभागात आपली तक्रार घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याला परीक्षा संचालकाच्या ऑफिस मध्ये उडवाउडवीची उत्तरे परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे याने दिली.
पुणे हे तिथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते.त्या पुण्यामध्ये विद्येच्या माहेरघरात त्याला अशी वागणूक मिळाली आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आदित्य तांगडे पाटील असे आहे.

.

आदित्य तांगडे पाटील असे हा विद्यार्थी हा विद्यार्थी गरवारे महाविद्यालयात BSC च्या अंतिम वर्षात होता. या वर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी आल्या. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणीला सामोरे जावे लागले तर काही काहींच्या निकालाच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या आहेत.

आदित्यला इतर सर्व विषयामध्ये चांगले मार्क्स आहेत. परंतु आदित्यला एका विषयात शून्य मार्क्स आहेत. आदित्यला वारंगल या ठिकाणी असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(NIT) या ठिकाणी Msc साठी प्रेवेश मिळाला आहे. त्याला एका विषयामध्ये शून्य मार्क्स मिळाल्यामुळे आदित्यला त्याच्या प्रवेशासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.  आदित्यला त्याची Bsc ची गुणपत्रिका नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे. तरच त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. १ डिसेंबर ला गुणपत्रिका सादर करणे गरजेचे आहे. तो नापास झाल्याचे दाखवल्याने आदित्यचे एक वर्ष वाया जाणार आहे.

या संदर्भात विचारणा करण्यासाठी आदित्य तांगडे पाटील हा विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेला. त्या ठिकाणी त्याला योग्य उत्तर मिळाले नाही.  त्यांनतर त्याने परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे याला भेटायला गेला. त्यावेळी आदित्यने त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग चालू केली. तेव्हा महेश काकडे याने सुरक्षा रक्षकांना बोलावून मारहाण करत बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी आदित्यला मारहाण करत बाहेर आणले, नंतर त्याला गाडीत टाकून विद्यापीठाच्या बाहेर सोडून दिले. घडला प्रकाराबाबत कुलगुरू नितीन करमळकर आदित्यचे पालक बोलले असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. आता घडल्या प्रकारावर कुलगुरू नितीन करमळकर काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना न्याय द्यायला कुठले ठिकाण आहे की नाही असा प्रति सवाल विद्यार्थी करत आहेत. पुणे विद्यापीठात झालेली घृणास्पद घटना अत्यंत निंदनीय आहे. हे अधिकारी, विद्यापीठातील कर्मचारी अशा प्रकारची वागणूक कुणाच्या जीवावर करत आहेत की त्यांनी गुंड पाळून ठेवले आहेत काय? असा सवाल देखील काही विद्यार्थ्यांनी केला आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.