मराठा समाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान!

गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षण हा विषय राज्यात आणि देशात खूप चर्चेचा विषय राहिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला कमालीचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात प्रलंबित असल्यामुळे,आणि आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सुरू झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षण विषयी गांभीर्य नसल्यामुळे,येणाऱ्या काळात आम्ही मोठे आंदोलन करणार असल्याचे संकेत मराठा समाजाच्या नेत्यांनी दिले आहेत.

त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सिरम इन्स्टिट्यूटला’ भेट देण्यासाठी 28 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत हे समजताच मराठा समाजाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही त्यांचा रस्ता अडवू. अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याबाबतची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटला कोरोना संदर्भात भेट देणार असून, कोरोना लसीच्या निर्मिती विषयी ते माहिती घेणार असल्याची माहिती आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीचे काम हे तिसऱ्या टप्प्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर 100 देशांचे राजदूत देखील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन लसीबाबत माहिती घेणार आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.