अजित पवारांच्या शेजाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचं काय झालं? काय म्हणाले,न्यायालय? वाचा सविस्तर!
प्रीतम शहा लेंकरेकर या उद्योगपतींनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांचे चिरंजीव दिवाळीत ज्यावेळी पाडव्याच्या दिवशी दुकान उघडायला गेले तेव्हा त्यांना त्यांच्या दुकानामध्ये प्रीतम शहा यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्यांनी आपण सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या नावावर असलेला बंगला आमच्या नावावर करा असा तगादा लावला होता. सतत मानसिक त्रास होत असल्यामुळे त्यांनी चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये जयेश उर्फ कुणाला चंद्रकांत काळे, नगरसेवक बबलू उर्फ जयसिंग काटे देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे यांच्यासह 9 जणांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्यांची रवानगी येरवडा कारागृह येथे करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांचा जमीन दोन वेळा नाकारण्यात आला आहे.
आज या प्रकरणातील तीन आरोपींच्या जामीनाबाबत जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. त्यामध्ये आज बचाव पक्षाचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला आहे. उद्या सरकारी वकील उद्या शहा यांच्यावतीने आपली बाजू मांडणार आहेत. या जमीन अर्जावर उद्या देखील सुनावणी होणार असून जर उद्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला तर अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोटावावे लागणार आहेत. जामीन फेटाळला तर या सावकारांचा येरवड्यातील मुक्काम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.