गूगल पे ( Google Pay) चा वापर करून व्यवहार केल्यास टॅक्स लागणार? याबाबत गूगलने दिले स्पष्टीकरण…
एक बातमी आज खूप व्हायरल झाली ती म्हणजे ‘गुगल पे’ चा वापर करून (Google Pay) पैशांचा व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून शुल्क आकारलं जाईल . या बातमीमुळे भारतीय भारतीय गुगल पे वापरकर्ते हे अस्वस्थ झाले होते. पण आता गुगलने स्वतः याबाबत स्पष्ट केले आहे की, भारतात ऑनलाईन पेमेंट अॅप गुगल पे या अॅपद्वारे पैशांचे व्यवहार केल्यास भारतीय वापर कर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. हा टॅक्स फक्त अमेरिकी गूगल पे वापरकर्त्यांना आकारण्यात येणार आहे.
गूगल पे चे भारतीय बाजारात अनेक वापरकर्ते आहेत. गूगल कंपनी एक नवीन ‘इंस्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम’ ही सिस्टम आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला शुल्क द्यावे लागेल, अशी बातमी प्रसार माध्यमामध्ये व्हायरल झाली होती. याबाबत आता गुगलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. जर कंपनीने या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले नसते तर कंपनीला भारतीय बाजारात खूप मोठा तोटा सहन करावा लागला असता.
“आकारण्यात येणारं शुल्क केवळ अमेरिकेसाठी आहे, भारतात गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिजनेससाठी शुल्क आकारलं जाणार नाही”, असे स्प्टीकरण गुगलच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे भारतातील गुगल पेच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/FnMZxARKqN00LX2z08a8zx
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.