उदयनराजे न्यायालयात का हजर झाले? जाणून घ्या अधिक

आपल्या व्यक्तिमत्व व वक्तव्यामुळे सर्वत्र प्रसिध्द असणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील  वाई न्यायालयात आज सुनावणीसाठी हजर झाले होते.

आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणात  उदयनराजे भोसले आणि त्यांचेच बंधू भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमध्ये  झालेल्या वादाप्रकरणी प्रकरणी सुनावणीसाठी उदयनराजे न्यायालयात  हजर झाले होते.

या दोघांमध्ये वाद होण्याचे कारण म्हणजे आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते. हे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताब्यातून  आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याच्या व्यवस्थापन हस्तांतरावरुन खासदार  उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन भावांमध्ये    वाद होता. ६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांच्यात  व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये  जोरदार राडा झाला. उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले दोघे आमने सामने आले होते.

महत्वाचे म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील  हा अनुचित  प्रकार घडला होता. त्यामुळे  परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे खासदार  उदयनराजे भोसले व इतर पंधरा जणांवर  कारवाई करण्यात आली होती.

आणेवाडी  टोलनाक्यावर झालेल्या वादानंतर सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ देखील झाला. त्यावेळी अज्ञाताकडून  गोळीबारही करण्यात आला होता.

या प्रकरणातील  उदयनराजे यांचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते,  उदयनराजे भोसले मात्र हजर  झाले नव्हते. खासदार  उदयनराजें यांना अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी स स्वतः हून वाई न्यायालयार हजर झाले होते.


खालील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/BgOc8lUvYxa8HqEf5AKyYl

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.