रोहित शर्मा बाबत सौरभ गांगुलीने सोडले मौन.

0

यंदाच्या आयपील स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स ने घवघवीत यश मिळवून आपली छाप उमटवली आहे.

नुकतीच आयपीएलची क्रिकेट स्पर्धा संपवून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाली आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याने दमदार खेळी करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाने पाच वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. याचमुळे अनेक चाहत्यांनी व गौतम गंभीर याने स्वतः रोहित शर्माला भारतीय संघाचा कॅप्टन होण्याची संधी मिळावी अशी आशा केली आहे.

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचा मानही संपादन केला. मात्र त्याची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी-20 व वन डे मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पहिल्यांदाच  प्रतिक्रिया दिली आहे.

सौरभ गांगुली म्हणाले, रोहित अजूनही दुखापतग्रस्त आहे.  रोहित त्याच्या दुखापतीमुळे  टीम मध्ये खेळू शकत नाही. तो फक्त 70 टक्के फिट झाला आहे. त्यामुळे त्याची टी-20 व वन डे क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली नाही. कसोटी संघात मात्र रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही विषयांवर चर्चा रंगवली जाते, असे मत व्यक्त बिसिसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी नको त्या विषयावर होणाऱ्या चर्चे बाबत नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे त्याचे चाहते व क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज झाले आहेत. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

मात्र याचवेळी विराट कोहली देखील या सामन्यामध्ये  दिसणार नाही. कारण विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.