गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळतेय.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून अध्याप विराट कोहलीला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कर्णधार म्हणून विराट कोहली आयपीएलमध्ये अद्याप आपली झलक दाखवू शकला नाही.
जगातला अव्वल खेळाडू असूनही रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नसल्याने,विराट कोहलीच्या नेतृत्वावर अनेकांनी टीका केली होती. याउलट आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाची अनेकांनी स्तुती केली. नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या आयपीएल 2020चे विजेतेपदही रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पटकावले.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल चे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माने केलेल्या या कारनाम्यावर क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे.
भारताला टी20 मध्ये उत्तम कामगिरी करायची असेल तर, टी-20 विश्वचषकामध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद असायला हवं, असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने नुकतेच व्यक्त केले आहे. असंच मत गौतम गंभीरने देखील व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला पहिला कसोटी सामना खेळून विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे आणि डिलिव्हरीच्या दिवसात अनुष्काला त्याची गरज असल्यामुळे, विराट कोहली एकच कसोटी सामना खेळून मायदेशी परतणार आहे. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांनी त्याच्यावर कडाडून टीका केली होती. असाच प्रसंग धोनीच्या आयुष्यात देखील आला होता,मात्र धोनीने कुटुंबापेक्षा राष्ट्राला प्राधान्य दिल्याचे दिसून आले होते. क्रिकेट चाहत्यांनी धोनीच्या त्या प्रसंगाची आठवणही करून दिली.
आज पुन्हा एकदा विराट कोहलीवर खूपच खालच्या पातळीची टीका झाल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये विराट कोहलीने सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण केलं पाहिजे, फटाक्यांविना दिवाळी साजरी केली पाहिजे. आणि प्रदूषण टाळले पाहिजे. असंं विराट कोहलीने या व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र भारतीय लोकांना हे रुचलं नाही. आणि ते विराट कोहलीवर खूपच खालच्या दर्जाची टीका करताना दिसून आले.
विराट कोहलीने ट्विटरवरून दीपावलीच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला. विराट कोहलीने दिलेल्या शुभेच्छांचा निषेध करत भारतीयांनी “अनुष्का अपना कुत्ता संभाल” हा हॅशटॅग ट्रेंड केला. दिवसभर जवळपास 83 हजार लोकांनी हा हॅशटॅग ट्रेंड
केल्याचे दिसून आले. दिवसभर हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम