कोण मारणार बाजी? वाचा सविस्तर

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा दुसरा क्वालिफायर सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईज हैदराबाद यांच्यामध्ये अबुधाबी मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर आयपीएल 2020 च्या दुसऱ्या फायनलीस्टची प्रतीक्षा संपणार आहे.

खराब सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादने जेसन होल्डर आल्यापासून कमालीची उंची गाठली आहे. सलग चार विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. तर दुसरीकडे भन्नाट सुरुवातीनंतर जसजशी टूर्नामेंट संपत येऊ लागली, तसतसा दिल्ली कॅपिटल संघाचा खेळ सुमार होत गेला आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी, या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सचा पगडा खूपच भारी वाटतोय.

दिल्ली कॅपिटल संघाच्या गोलंदाजीची मतदार नोखिया आणि रबाडा यांच्यावर आहे. मात्र गेल्या दोन सामन्यात त्यांची सुमार कामगिरी झाल्याने दिल्ली कॅपिटल संघासमोर चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅप्टन संघाला आपल्या फलंदाजीमध्ये देखील चमक दाखवली लागेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण सतरा वेळा आमना सामना झाला आहे. यामध्ये हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल संघाला अकरा वेळा धुळ चारली आहे.

आज जो संघ जिंकेल त्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यात बाजी मारणारा संघ, दहा तारखेला दुबईच्या मैदानावर मुंबईविरुद्ध फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.