Google pay, phone pay बाबत सरकारचा मोठा निर्णय, नियम बदलले वाचा सविस्तर
2016 मध्ये 8 नोव्हेंबर ला संध्याकाळी मोदी सरकारने आजपासून जुन्या नोटा चलनातून काढणार असल्याचे सांगितले व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून डिजिटल बँकिंग क्षेत्राने मजल मारली. भारतामध्ये डिजिटल बँकिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. तेव्हापासून अगदी सर्वसामान्य लोकांनी सुद्घा डिजिटल बँकिंग ला पसंती दिली. डिजिटल बँकिंग प्रणालीची लोकप्रियता वाढत गेली.
सुरुवातीला PAYTM या अॅपने मजल मारली. भारतीय बाजारात या अँप ला बरीच लोकप्रियता मिळाली. नंतरच्या काळात मात्र गूगल पे ने भारतीय बाजारात लोकप्रियता मिळवली. सोबतच फोन पे ला सुध्दा मोठ्या प्रमाणात लोकांनी पसंती दिली. फोन पे ने भारतीय बाजारात सर्वाधिक 40 टक्के एवढे ग्राहक मिळविले आहेत. तर गूगल पे देखील त्याच्या खालोखाल आहे व अन्य डिजिटल बँकिंग ऍप 20 टक्के वापरली जातात.
भविष्यामध्ये या अॅपची मक्तेदारी वाढू नये यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ने नवीन नियम लागू केला आहे. या नवीन नियमानुसार या अँप ला 30 टक्के कॅप लागणार आहे.यामुळे डिजिटल व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता गूगल पे च्या वतीने सांगण्यात आहे आहे. सध्या गूगल पे व फोन पे ही अँप थर्ड पार्टी अँप आहेत.
नवीन नियमानुसार कंपन्यांकडे होणाऱ्या ट्रानजेक्शनच्या 30 टक्के ट्रानजेक्शन करता येणार आहे. त्यामुळे एकाच अँप ची मुजोरी वाढणार नाही यासाठी हा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ने घेतला आहे. कारण यांच्याकडे बँकिंग परवाने नाहीत. मात्र सध्या भारतीय बाजारात आपले हात मजबूत करण्याचा प्रयत्न असलेल्या रिलायन्स जियो पेमेंट बँक व पे tm यांना मात्र हा नवीन नियम लागू होत नाही. कारण या दोन्ही अँप कडे बँकिंग परवाने आहेत. भविष्यात या दोन्ही अँप ला या नियमाचा फायदा होणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम