विराट कोहलीला वॉर्नर भारी!
दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल२०२०चा एलिमिनेटर सामना सनराईज हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यामध्ये अबुधाबी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. चुरशीच्या झालेल्या लढतीत, सनराईजर हैदराबादने रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघावर सहा गडी राखून विजय मिळवला.
डेव्हिड वॉर्नर ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनीही डेव्हिड वॉर्नरने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत, विराट कोहलीच्या संघाला १३१ रन्सवर रोखले.
१३२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या सनराईजर हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. ११.५ षटकात ४बाद ६७ धावा
अशा नाजूक स्थितीतून हैदराबादला केन विल्यमसन आणि जेसन होल्डर यांनी बाहेर काढले. फक्त बाहेरच नाही तर या दोघांनी शेवटपर्यंत किल्ला लढवत हैदराबादला विजय मिळवून दिला. हैदराबाद कडून केन विल्यमसनने सर्वाधिक नाबाद ४४ चेंडूत ५०धावांची खेळी केली.
सनरायझर्स हैदराबादकडून जेसन होल्डरने चार षटकांत बेंगलोरचे महत्त्वाच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर त्याने फलंदाजीमध्ये देखील चमक दाखवली. होल्डरने शेवटच्या षटकामध्ये दोन खणखणीत चौकार ठोकत, सनरायझर्स हैदराबादला एलिमिनेटर सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत विराट कोहलीचा संघ महत्त्वाच्या सामन्यात १३१ धावाच करु शकला. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक ४३ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या पराभवाबरोबरच बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाचे या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आलं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम