सुर्यकुमार यादव भारतीय संघात नसल्याने निराशा;पोलार्ड

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा 48वा सामना आज मुंबई विरुद्ध बेंगलोर यांच्यामध्ये अबुधाबी मैदानावर खेळविण्यात आला.

देवदत्त पडिकलने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर (४५ चेंडू ७४ धावा) विराट कोहलीच्या संघाने मुंबई समोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते.

165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने नाबाद ४३ चेंडूत ७९ धावांची झुंजार खेळी करत मुंबईला एखादी सामना जिंकून दिला. या विजयाबरोबरच प्ले ऑफमध्ये जाणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला.

आजच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार सूर्यकुमार यादवने पटकावला. 73 चेंडूत 79 धावांच्या खेळीत सूर्यकुमार यादवने 10 चौकार तर तीन उत्तुंग षटकार लगावले.

कर्णधार कायरन पोलार्डने सूर्यकुमार यादवच्या या खेळीचे कौतुक केले. त्याचबरोबर पोलार्ड म्हणाला,आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर झाला. निळ्या जर्सीमध्ये सूर्यकुमार यादवचं नाव नसल्याने खूप निराशा झाली आहे. सूर्यकुमार यादवने केलेल्या खेळीचे अनेक दिग्गजांकडून कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.