मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून रोहित शर्माचे नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओज, फोटोज शेअर केले. फोटो व्हिडिओ शेअर केल्यानंतर लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी जर रोहित शर्मा फिट असेल तर, बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची निवड का केली नाही? याविषयी चाहत्यांना जाणून घेण्याचा अधिकार आहे,असा सवाल उपस्थित केला आहे.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची बीसीसीआयने घोषणा केली. घोषणा केलेल्या संघात कोणत्याही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची निवड करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण म्हणजे मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून रोहित शर्माचे सराव करतानाचे व्हिडीओ,फोटोज शेअर केले. रोहित शर्मा सराव करत असेल तर आयपीएलमध्ये उर्वरित सामन्यात खेळताना दिसू शकतो. असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला आहे.
जर तो नेटमध्ये सराव करताना दिसत आहे,तर आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड का केली गेली नाही? याविषयी बीसीसीआयने स्पष्ट सांगायला हवं. असं लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. लिटल मास्टर यांनी याविषयी चाहत्यांना सर्वप्रथम जाणून घेण्याचा अधिकार आहे असंही म्हटलं आहे. सुनील गावस्कर हे आपले मत परखडपणे मांडण्यासाठीही ओळखले जातात.
रोहित शर्मा आयपीएलमधील उर्वरित सामन्यात खेळताना दिसला तर,त्याची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का झाली नाही? यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम