रोहित शर्मा आयपीएल मधील उर्वरित सामने खेळणार का?
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकताच बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर रोहित शर्माची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही. रोहित शर्मा,मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी हा एक धक्का मानला जात आहे.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड झाली नसल्यामुळे,मुंबई इंडियन्सचे चाहते,रोहित शर्मा आयपीएलमधील उर्वरित सामने खेळणार आहे की नाही? या मोठ्या संभ्रमात पडले आहेत.
रोहित शर्मा दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना दिसला नव्हता. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्यामुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यात तो खेळणार आहे की नाही? याविषयी मोठी शाशंकता निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे चित्र आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आयपीएलमधील उर्वरित सामने खेळणार आहे की नाही? याविषयी अधिकृतपणे काहीही सांगितलं नसलं तरी,ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शर्माची निवड झाली नाही. याचा अर्थ त्याची दुखापत गंभीर असून आयपीएलमधील उर्वरित सामने तो खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्टच झाले आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा चाहत्यांसाठी हा एक धक्काच मानला जातोय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम