आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर;

0

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली आहे. दुखापतीमुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची निवड झाली नसून काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चार कसोटी,तीन वनडे आणि तीन टी-ट्वेटी खेळवण्यात येणार आहेत.

रोहित शर्मा,इशांत शर्मा,भुवनेश्वर कुमार या प्रमुख खेळाडू शिवाय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीमुळे शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांची भारताच्या कसोटी संघात वर्णी लागली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपासून भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या के एल राहुलचं देखील कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. के एल राहुलची वनडे आणि टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केलेली आहे.

डोमेस्टिक आणि आता आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वरून चक्रवर्तीला भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल मध्ये वरुण चक्रवर्तीने दिल्ली विरुद्ध खेळताना महत्त्वाच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले होते.

वनडे आणि टी-20 संघात ऋषभ पंतला स्थान मिळालं नाही. वनडे आणि टी-20 मालिकेत मयंक अग्रवालची निवड करण्यात आलेली आहे. मयंक अग्रवाल आता भारताच्या तिन्ही संघात असणार आहे.

*आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा असणार आहे भारतीय संघ-*

*टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :*

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

*वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :*

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

*कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :*

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.