खासदारांचा गोठवलेला निधी गेला कुठे : उदयनराजे भोसले.


खासदारांचा गोठवलेला निधी गेला कुठे असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दसऱ्याच्या महुर्तावर भवानी तलवारीचे त्यांनी पूजन केले व त्यावेळी उदयनराजे बोलत होते. खासदार निधी गोठवला पण तो खर्च झाला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उदयनराजे भोसले यांनी निधीबाबत सवाल करून भाजप सरकारला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “खासदार निधी आमदार निधी जो तुम्ही तुमच्याकडे वर्ग करून घेतला आहे. एवढे अगणित पैसे आपल्याकडे जमा झाले आहेत. महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामधील इतर राज्यांमध्ये सुध्दा एवढा निधी जमा असताना तो गेला कुठे.” असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी आपल्याच भारतीय जनता पार्टीला धारेवर धरले आहे.

उदयनराजे भोसले हे आपले मत परखड मांडण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना देखील अशाच प्रकारे परखड मत व्यक्त करायचे त्यामुळे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याशी त्यांचे कधीही जुळले नाही. ते सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टिकास्त्र सोडायचे. उदयनराजे भोसले हे कुणालाही न जुमानणारे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीला खासदार निधीबाबत विचारून भाजपच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. येत्या काळामध्ये उदयनराजे भोसले आपल्या पक्षाशी कसे संबंध ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.