दारुण पराभवाबरोबर चेन्नईच्या प्ले ऑफमधील आशा संपुष्टात

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल२०२० चा ४१वा सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये शारजाह क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्यात आला.

कॅप्टन कायरॉन पोलार्डने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. हा सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’च्या स्थितीत होता. मात्र चेन्नईचे फलंदाज प्रेशर हँडल करू शकले नाहीत. चेन्नईने पावर प्ले मध्येच २१ धावांत पाच गडी गमावले.

सुरुवातीच्या धक्क्यातून चेन्नई सुपर किंग उभारू शकली नाही. चेन्नईने २० षटकांत अवघ्या ११४ रन्स केल्या. चेन्नई कडून नवोदित खेळाडू सॅम करणने सर्वाधिक ४७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला असला तरी,चेन्नईच्या फलंदाजांचा कॉन्फिडन्स आणि त्यांनी खेळलेले शॉट,हे खुप साधारण होते. चेन्नईच्या आजच्या सामन्यात झालेल्या अवस्थेला फलंदाजही तितकेच जबाबदार आहेत. मुंबई इंडियन्स कडून ट्रेंट बोल्टने भेदक मारा करत ४ षटकात १८ धावा देत, चार फलंदाजांना तंबूत पाठवले.

११५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी जबरदस्त सुरुवात करत सामना एकहाती जिंकून दिला. दुखापतीमुळे आजचा सामना रोहित शर्मा खेळू शकला नसल्याने,डिकॉक बरोबर सलामीवीर म्हणून ईशान किशनला संधी मिळाली.

रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून संधी मिळणाऱ्या ईशान किशनने चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. ईशान किशनने ३७ चेंडूत ६८ धावा केल्या यामध्ये सहा चौकार तर पाच उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला डी कॉकने (३७ चेंडूत ४६ धावा) चांगली साथ दिली. या दोघांनी अवघ्या १२.२ षटकामध्येच मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.

चेन्नई साठी हा सामना करो या मरो स्थितीत होता. मात्र त्यांचा या सामन्यातला खेळ खूपच साधारण राहिला. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये त्यांना चमक दाखवता आली नाही. सर्व डिपार्टमेंटमध्ये साधारण खेळ केल्याने चेन्नई सुपर किंगचा या सामन्यात दारुण पराभव झाला. या पराभवा बरोबरच चेन्नई सुपर किंगच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.