धोनी अँड कंपनी समोर आज ‘करो या मरो’ची स्थिती!
दुबईमध्ये सुरू असलेली आयपीएल2020 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. प्ले ऑफमध्ये कोणताही संघ पोहचला नसला तरी,दिल्ली कॅपिटल्स,बंगलोर रॉयलचॅलेंजर्स, आणि मुंबई इंडियन्स हे तीन संघ गुणतालिकेत एक-दोन-तीन क्रमांकावर आहेत. प्ले ऑफमध्ये या तिघांचं स्थान जवळपास पक्के मानले जात आहे.
चौथ्या क्रमांकासाठी आता राहिलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद,राजस्थान रॉयल्स,कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग या संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाकडे एका विजयाचं अडवांटेज असलं तरी,या पाच संघापैकी कोणताही संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो.
या स्पर्धेमधील 41वी मॅच आज चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये शारजाह क्रिकेट ग्राउंडवर सायं ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. चेन्नईच्या दृष्टीने आजचा सामना करो या मरो स्थितीत असणार आहे. चेन्नई सुपर किंग या सामन्यात पराभूत झाली तर टेक्निकली या स्पर्धेमधील प्ले ऑफचं त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे.
चेन्नई सुपर किंग जर आज पराभूत झाली तर,आयपीएलच्या इतिहासामध्ये चेन्नई सुपर किंगवर पहिल्यांदाच साखळी सामन्यांमध्ये गारद होण्याची नामुष्की ओढवणार आहे.
हा सामना शारजाह मैदानावर होणार असल्यामुळे हायस्कोरिंग गेम होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स हा संघ समतोल वाटत असून हा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याउलट चेन्नई सुपर किंग संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट्स चिंतेचा विषय आहे. खासकरून फलंदाजी.
आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या महेंद्रसिंग धोनीचे यावर्षी अनेक डावपेच फेल होताना दिसतायत. यामध्ये सॅम करणला सलामीला पाठवण्याचा निर्णय देखील सपशेल अपयशी होताना अद्यापतरी पहायला मिळाला आहे. एक्सपेरिमेंट करण्याची महेंद्रसिंग धोनीकडे ही एक शेवटची संधी असून,या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघ मुसंडी मारतोय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आज जर पराभूत झाली तर,त्यांचं प्ले ऑफमधलं आव्हान संपुष्टात येणार आहे. चेन्नई आणि त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम