‘पूरनच्या’ चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाबची दिल्लीवर मात!

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा ३८वा सामना दुबई क्रिकेट ग्राउंडवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये खेळवण्यात आला.

खराब सुरुवातीनंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मधल्या फळीतला डावखुरा फलंदाज निकलेस पुरणच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स संघावर पाच खेळाडू राखून विजय मिळवला.

१६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या किंग इलेव्हन पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. सुरुवातीचे प्रमुख तीन खेळाडू आवघ्या ५५धावांत बाद झाल्यानंतर, निकलेस पूरण आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेत,४० चेंडूत ६९ धावांची भागीदारी करत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. नेकलेस पूरणने सर्वाधिक २८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्याला मॅक्सवेलने २४चेंडूत ३२धावा करत चांगली साथ दिली.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आता दहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. आठ गुणांसह किंग्स इलेव्हन पंजाब गुणतालिकेत आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. या विजयाबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले ऑफ मध्ये जाण्याचे आपले आव्हान कायम ठेवले आहे.

तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५बाद १६४धावा केल्या. शिखर धवन वगळता दिल्ली कॅपिटल संघाच्या कोणत्याही फलंदाजाला विशेष अशी कामगिरी करता आली नाही. शिखर धवनने एक हाती किल्ला लढवत नाबाद ६१ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. आणि दिल्लीला सन्मानजनक स्कोअर मिळवून दिला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.