…असा कारनामा करणारा ‘गब्बर’ एकमेव खेळाडू!

0

आयपीएल २०२०चा ३८वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये दुबई क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. या सामन्यात दिल्लीचा गब्बर सलामीवीर शिखर धवनने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

शिखर धवनने चेन्नई विरुद्ध आपल्या करिअरचं पहिलं दमदार शतक झळकावत आपण जबरदस्त फॉर्ममध्ये आहोत,हे दाखवून दिलं होतं. चेन्नई विरुद्ध शिखर धवनने एक हाती लढा देत सामना जिंकून दिला होता.

शिखर धवनने हाच फॉर्म पंजाब विरुद्धच्या सामन्यात देखील दाखवत अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. शिखर धवनने आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. असा पराक्रम करणारा शिखर धवन हा सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी विराट कोहली,रोहित शर्मा,सुरेश रैना,डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल या दिग्गजांनी असा कारनामा केला आहे.

5000 धावांच्या रेकॉर्ड्स बरोबर शिखर धवने सलग दुसऱ्या सामन्यात लागोपाठ शतक केले. असा पराक्रम करणारा शिखर धवन आयपीएलमधला आतापर्यंतचा एकमेव खेळाडू ठरला आहे.

दिल्लीच्या संघाने किंग्स इलेव्हन पंजाब समोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. शिखर धवनने या सामन्यात 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या.

वर्ल्ड कप 2019 मध्ये दुखापत झाल्यानंतर शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन केले, परंतु तो पूर्वीसारखा लईत दिसत नव्हता. मात्र आता आयपीएल२०२० मध्ये शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये असून उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.